शिक्षक अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करा- आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समितीची मागणी
चंद्रपूर:- आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर मा.कुणाल खेमनर, जिल्हाधिकारी यांचा मार्फत मा. वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील दरवर्षी हजारो विद्यार्थी/ युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधत फिरताना आढळतात. पण ग्रामीण भागातील सामान्य शेतक यांचा मुलापर्यंत कोणत्याही प्रकारची रोजगार नसल्याचे चित्र दिसत आहे. याकडे शासनाने लक्ष्य देण्याची गरज आहे.
बेरोजगारी प्रश्न गंभीर जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या रोजगार निर्मितीकरिता कुठेलाही प्रयत्न दिसत नाही.
प्रत्येक वर्षी D.ed व B.ed पदवी घेणाऱ्या युवकांच्या संख्येसोबतच बेरोजगारीही वाढत असल्याने दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक युवक D.ed, B.ed धारक बेरोजगारिचा आकडा वाढत आहे.यामुळे बेरोजगारी प्रश्न गंभीर झाले आहेत.
म्हणून शिक्षक अभियोग्यता (TAIT) चाचणी तात्काळ घेऊन विदर्भातील शिक्षक भरती घेण्याबाबत.
विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडत आहे. विदर्भामध्ये अनेक D.ed, B.ed धारक विद्यार्थी पात्रता परीक्षा TET पात्र आहे. आणि शासनाने TAIT परीक्षा २०१७ मध्ये एकदाच घेतली आहे. त्यामुळे कसलाही विलंब न करता शिक्षक अभियोग्यता चाचणी तात्काळ घेऊन विदर्भातील शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी जेणे करून विदर्भातील शिक्षकांचा पदाचा अनु अनुषंग भरून काढून D.ed, B.ed शिक्षक पात्रता परीक्षा पात्र धारकांना न्याय देता येईल.विदर्भामध्ये 10 वर्षांपासून अजून प्रयत्न शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची वानवा आहे आणि याचा परिणाम गग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडत आहेत.शिक्षकच नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळामधील विद्यार्थी संख्या दरवर्षी कमी होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) तात्काळ घेऊन शिक्षकाची पद भरती करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समिती तर्फे करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शुभम उईके,अध्यक्ष, जितू पेंदाम, राजू सिडाम, पुरुषोत्तम मसराम, सूरज निमसरकर, योगेश घरात, नितेश जुनगरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षक अभियोग्यता (TAIT) चाचणी घेऊन शिक्षक भरती केल्यास समिती आपली आभारी राहील.